Friday, August 10, 2018

खिडकी


खिडकी वाट पाहते
जाणाऱ्याची, येणाऱ्याची,
वाऱ्याची,उन्हाची, पावसाची,
मेघदूताची?
वाट पहात थकून जाते
खिडकी गिऱ्हाइकाची
बंद उघड बंद उघडचा खेळ
चालूच राहतो,
आता... खिडकी वाट पाहते
अर्धोन्मलीत पाप्ण्यातून आत
डोकावणाऱ्या चंद्रकलेची.


No comments:

Post a Comment

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...