विचारांच्या आकाशात स्वैर डोलणारा,
भटकणारा विहंग,
काळ्या,पांढरया, नारंगी, तांबड्या
ढगातून
स्थैर्य म्हणजे काय शोधणारा, हा मनाचा वेडा पतंग.
त्याच विचारात गुंतणारा, गुरफटणारा, गुन्ता सुटत नाहीसे
पाहून
तुटलेल्या विचारांच्या गाठी बांधणारा.
કાયપો, છે!! च्या गर्जनेत भानावर येऊन,
पुनश्च भरारी मारणारा,
आपला अथक प्रवास मात्र न सोडणारा.
पुन्हा एक नवा पतंग सूर्योदयाच्या
साक्षीने
उंच भरारी घेणारा.
मन, एकलकोंडा विहंग.
मन, एकलकोंडा विहंग.
No comments:
Post a Comment