मुंगी साखरेला म्हणाली
“तू एवढी गोड कशी?”
साखर म्हणाली
वडील माझे “ऊस”
माझ्यात उतरलंय
त्यांचे अति गोड रक्त
म्हणून असावी मी ‘गोड’
व माणसे म्हणता म्हणून
मला माझी चव कशी कळणार?
तुम्हा मनुष्याना देखील
कुठे कल्पना असते
आपल्या स्वभावाची?
स्वभावाचे मोजमाप
आप्तजन ठरवितात,
आप्तजन ठरवितात,
‘तो वडिलांसारखा एक कल्ली’
‘तीआई सारखी फटकळ’
अशा सोयीस्कर गैरसमजुतीत
गोड मानतात.
आहे की नाही गोड गम्मत!
अरूण, खरोखरीच तुझ्या कवीतांची विन्दांच्या बालगीतांप्रमाणे तुफानी घोडदौड चालू आहे. मस्तच आहेत.
ReplyDelete