ऐका देऊनी तुमचे कान
होऊन थोडेसे लहान
एके दिवशी काय झाले...
होऊन थोडेसे लहान
एके दिवशी काय झाले...
बसला पट्कन फांदीवर,
शोधू लागला पेरू हिरवागार
अचानक...
सुटला वारा सुसाट न थंडगार,
ढग गरजले, बिजली कडाडली,
पावसाने घातले थैमान
झाडे रंगवली हिरवीगार,
वाऱ्या पावसाचे पाहून रुद्र रूप
भिजून पोपट थंडीने कुड कुडला
लपून,दडून बसला पोपट,
पानामागे चिडी चूप.
जसा पाऊस पळाला, वारा थांबला,
तसा पेरू शिवाय,
हुशार पोपट भुर्कन,उडून गेला,
हुशार पोपट भुर्कन,उडून गेला,
अन गोष्ट ऐकता..ऐकता
बाळ माझा झोपी गेला,
बाळ माझा झोपी गेला,
No comments:
Post a Comment