एके दिवशी काय झाले...
२२ फेब्रुवारी २०१७
मतदान जवळ आले!
मतदान जवळ आले!
वाघाला वाटले मीच राजा
जनता मलाच कौल देणार
हाल चाल झाली तळ्यातील
चिखलात
अन हळूच...
एक कमळ उमलले पाहून
वाटली भीती वाघाला,
पाहून उमलत्या कमळाला,
भुंगा भूण भूणायला लागला
,
कमळाने केले दुर्लक्ष
सोडूंन दिले भुंग्याला
वाघाच्या कानाशी, भुणभुणायला,
झाले हि तसेच
झाले हि तसेच
लागला डरकाळ्या फोडायला,
डरकाळ्याने बसला घसा वाघाचा...
मतदानाच्या दिवशी
फुटेना आवाज वाघोबाचा,
फते केले काम भुंग्याने
भरून गेला तलाव कमळाने
पाहून मतदार खुश झाले,
शेपूट मात्र हळू हळू वाघोबाचे,
गेले पायामध्ये.
कशी जिरवली एका छोट्याशा
भुंग्याने... !
आहे की नाही गम्मत!!
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
Tongue in cheek! Ha ha ha
ReplyDeleteवा..वा.. काय पण शब्दानी हाणले आहे.बिचारा वाघ. स्व बळ शोधत अजूनही फिरतो आहे. कमळ दिसलं रे दिसलं की लपतो आहे !
ReplyDelete