Thursday, August 2, 2018

भुंगा




एके  दिवशी काय झाले...

२२ फेब्रुवारी २०१७
मतदान जवळ आले!
वाघाला वाटले मीच राजा
जनता मलाच कौल देणार
हाल चाल झाली तळ्यातील चिखलात

अन हळूच...

एक कमळ उमलले पाहून
वाटली भीती वाघाला,
पाहून उमलत्या कमळाला,
भुंगा भूण भूणायला लागला
,
कमळाने केले दुर्लक्ष
सोडूंन दिले भुंग्याला
वाघाच्या कानाशी, भुणभुणायला, 
झाले हि तसेच
वाघ बिथरला,
लागला डरकाळ्या फोडायला,
डरकाळ्याने बसला घसा वाघाचा...
मतदानाच्या दिवशी
फुटेना आवाज वाघोबाचा,
फते केले काम भुंग्याने
भरून गेला तलाव कमळाने
पाहून मतदार खुश झाले,
शेपूट मात्र हळू हळू वाघोबाचे,
गेले पायामध्ये.
कशी जिरवली एका छोट्याशा
भुंग्याने... !

आहे की नाही गम्मत!!

शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

2 comments:

  1. वा..वा.. काय पण शब्दानी हाणले आहे.बिचारा वाघ. स्व बळ शोधत अजूनही फिरतो आहे. कमळ दिसलं रे दिसलं की लपतो आहे !

    ReplyDelete

दोन बाजू नाण्याच्या...

दोन बाजू नाण्याच्या... नाण्याला दोन बाजू असतात. एक छापा आणि दुसरा काटा. छापा म्हणजे चित्र आणि काटा म्हणजे नाण्याची किंमत. नाणं तेच असतं, पण ...