Tuesday, July 31, 2018

घाई


मला घाई
उठायची, बसायची,
लिहायची वाचायची
खायची प्यायची
बघायची शिकायची
नोकरीची  
ठाऊक नाही हि घाई
कशासाठी?
विचारांती देखील कळत नाही
त्यामुळे वळत नाही
समजत नाही उमजत नाही
पर्याय काही सापडत नाही
प्रश्न काही सुटत नाही
कदाचित... हे उत्तर तर नाही?
घ=घामाचा
ई= ईर्षेचा
इर्षे शिवाय घाई नाही
घाई शिवाय घाम नाही
म्हणूनच सवय सुटत नाही
आहे की नाही गम्मत.

No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...