Thursday, July 26, 2018

मन






मन
एक विहीर
त्याची खोली
मोजून संपत नाही
तळ कधीच दिसत नाही
प्रतिबिंब मात्र दिसते
जगाला दिसते  तसे
सुंदर, कुरूप,
शांत, उग्र,
स्वच्छ, गढूळ.
जगात उमटवलेल्या
ठशा प्रमाणे
पहा एकदा डोकावून
दिसता कसे ते
रोज नवे रूप दिसेल
केलेल्या कर्मा नुसार
बदलणारे...
आहे की नाही गम्मत
भटक्या मनाची.

1 comment:

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...