जुलै१८,
२०१८
ओळख
“वाटते सानुली मंद झुळूक
मी व्हावे,घेईल ओढ मन
तिकडे स्वैर झुकावे”
ही कविताम्हणजे मूर्तस्वरूपात मी.
लहानपणापासून माझे चित्त/मन/मेंदू कधीच
एके ठिकाणी स्वस्थ विसावले/विसावला नाही,
चांगले का वाईट याचा मी कधीच आढावा
घेतला नाही,
कारण ह्या विचारांना आजही ह्या मनाच्या
अश्वाला मला लगाम घालता आला नाही.
एका विचाराचा दुसऱ्या विचाराशी काहीही
संबंध नाते नसते. थोडक्यात सांगायचे तर,
ह्यांचे नाते संबंध म्हणजे हिंग-पुस्तक-तलवार,गाण्यांच्या,
कवितेच्या ओळीपासून
ते शाळेत कोयबा खेळताना कसा जिंकलो
ते, शब्दांच्या नवीन व्याख्या पर्यत काहीही
विचारांची भरकट.यात अनेक आठवणी, चेहरे,
आयुष्यात ओझरते का होईना भेटलेले प्रवासी,मित्र, मैत्रिणी, सहकारी, शिक्षक, नोकर,चाकर,
येणारे जाणारे,पटकरून काही सेकंदासाठी डोकावतात एखादी आठवण करून देतात व लगेच नाहीसे
होतात,
त्यांची जागा पुढील विचाराने घेतलीही
असते.
असो.
जाहिरात क्षेत्रांत या भिर भिरत्या,
फिरत्या मनाचा हा स्वैराचार फार उपयोगी पडला.
त्यामुळेच थोडे फार यश पदरात पडले.
ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ
वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता
कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना
बाल गीते,
मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,
हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात
शोधूनही सापडणार ना मोडणार.
माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास
करण्यास वाचावे.
ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही
नाही,
काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
अरूण काळे
No comments:
Post a Comment