Friday, July 27, 2018

गुरु



आज गुरु पोर्णिमा!
वर्षातून गुरुचे एकदा दर्शन घेण्याचा.


गुरु कोणाला म्हणावयाचे?
"आई वडील सर्व प्रथम गुरु" 
त्यानंतर माझे अस्तित्व सुरु
माझ्या अस्तित्वास आकार दिला माझ्या 
शालेय, विद्यालयातील गुरुजनांनी, नंतर
माझ्या आयुष्याच्या टप्प्या टप्प्यावर भेटलेल्या 
अनेक गुरूनी , 
यातील अनेक गुरु आज चंद्राने नेले. 
प्रत्येक गुरुपोर्णिमेस, 
चंद्र अधिक तेजोमय दिसू लागला. 
आता हे विश्वची माझे गुरु.
या विश्वासात येणाऱ्या सर्व  गुरुपोर्णिमेस माझा चंद्रास नमस्कार,
मी करतो माझी गुरुपोर्णिमा साकार.  



No comments:

Post a Comment

तू आहेस!!!!

  तू आहेस !!!! तू आहेस तरी कोण? थोड्यावेळासाठी समजा, मी तुझे अस्तित्व विसरलो, मग हे विश्वास न बसणारे चमत्कार कोण करतो? उत्तराची सुई तुझ्या द...