Friday, July 20, 2018

चाळ



 चाळींच्या झाल्या बिल्डिंगा
बिल्डींगांचे झाले टावर्स
आता
शेजारी वाटीत साखर मागणे नाही   
पाण्यासाठी भांडणे नाही
एकत्र साजरे सणवार नाही
मुलांची दंगा मस्ती धावणे नाही
आता
आता मजल्यावर फक्त शुकशुकाट,  
तुझे घर, माझे घर,
माझा संसार, तुझा संसार,
माझी मुले, तुझी मुले,
स्मितहास्या पलीकडे,ओळख नाही
ओळख झालीच तर,
लिफ्टपुरती, वरखाली जातांना
हाय हलो पुढे संभाषण नाही,
तू तुझा, मी माझा,
तुझी गाडी छोटी, माझी मोठी,
तुझी मुले लोकल शाळेत
माझी इंटरनॅशनल शाळेत,
माझा उद्योग तुझी नोकरी,
माझा खांदा तुझ्या खांद्याला कसा लागेल.
ह्या काळजीने झोप उडाली,
टावर्स पेक्षा चाळ बरी
कशी?
सांगेन कधीतरी...

No comments:

Post a Comment

तू आहेस!!!!

  तू आहेस !!!! तू आहेस तरी कोण? थोड्यावेळासाठी समजा, मी तुझे अस्तित्व विसरलो, मग हे विश्वास न बसणारे चमत्कार कोण करतो? उत्तराची सुई तुझ्या द...