Thursday, July 19, 2018

चंद्र






एके दिवशी काय झाले

रात्र पाळी करून पेंगळलेल्या
आली जाग चंद्राला,
पाहून म्हणाला सूर्याला
‘दोस्ता,डोळा कधी लागला
कळलेच नाही... 
...उघडला डोळा बघ आता तुझ्या किरणाने
करूया कां एकत्र जगाला ‘गुड मॉर्निंग’!
पाहून पेंगळलेल्या चंद्राला,
पसरवित किरणे लागला सूर्य हसायला.
लपला चंद्र ढगा आड
चांदण्यांनी घेतली ओढून शाल लाल
पाहून त्यांना लपताना
सूर्य हसून म्हणाला जगाला
||उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजानन||

No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...