Tuesday, July 24, 2018

लगोरी








एके दिवशी काय झाले

जवळ पास काही नव्हते,
अशा शांत जागेत सोबती होते ते,
फक्त विचार विचार आणि विचार.
एकावर एक सुविचारांची लगोरी रचत होतो,
भिती होती एखाद्या वाईट विचाराचा चेंडू कधी येइल,
नी कधी लगोरी उध्वस्त करेल.
उध्वस्त झालेले सुविचार पुन्हा रचणे
ह्याला पर्याय नव्हता.


No comments:

Post a Comment

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...