शाई नसती तर
जग स्थिर राहिले असते का?
प्रगती म्हणजे काय हा प्रश्नच
उद्भवला नसता का?
आदिमानवा प्रमाणे
व्यवहार चालू राहिले असते का?
नाही नाही नाही
गरज ही शोधाची जननी,म्हणून
शाई जन्मास आली, म्हणूनच
रामायण, महाभारत, कुराण, बायबल
लिहिले गेले व सुरु झाले मानव जातीचे अधोपतन.
जात, वर्ण धर्म,भेद,भाव, याचे राजकारण.
न संपणारी कापूस कोंड्याची
गोष्टं
जन्मास आली...
कशी?...
सांगेन कधीतरी...
No comments:
Post a Comment