एके दिवशी काय झाले
ठोकाविले काऊने चिमणीचे दार
चिऊताई चिऊताई दार उघड
मी नाही जा, मी माझ्या बाळाला...
बाहेरून काऊ खेकसला… गप्प बस
नको गिरवूs जुना धडा
पाठ झालाय सर्व जगाला,
ऐक काय मी सांगतोय ते
बाळाला अंघोळ घालू नकोस
बाळाला पावडर लाऊ नकोस
बाळाला तीट लाऊ नकोस
कारणे उगाच देऊ नकोस
गोष्टी प्रमाणे वागू नकोस
घेऊन ये बाहेर बाळाला
कोवळे ऊन झेलायला
चार दाणे वेचायला
पंखात हवा भरायला
जगाशी ओळख होऊ दे
त्याचे आभाळ त्याला शोधू दे.
उंच भरारी मारू दे,
No comments:
Post a Comment