Friday, August 3, 2018

तो


अरे, तुला कंटाळा कसा येत नाही?

रोज उठून करोडो जीव वरून खाली सोडतोस,
नुसते मनुष्य प्राणी नाहीत तर निसर्ग,पक्षी, प्राणी
कृमी, कीटक, जीव, जंतू ह्याचा हिशोब
आम्हा मनुष्य  प्राण्यांच्या बुद्धी पलीकडे आहे.
बरे नुसते सोडत नाही तर त्यांना योग्य देशात
योग्य शहरात योग्य कुटुंबात योग्य वेळेस .

अरे तू थकत कसा नाहीस?

त्या पलीकडे तू त्यांचा दिन क्रम,
पृथ्वी वरील वास्तव्याची नोंद कशी ठेवतोस? 
या अगण्य कळसूत्री बाहुल्या कशा काय नाचवतोस?
???? प्रश्न प्रश्नप्रश्न .

थोड्या वेळा करिता समजा विसरलो तूझे अस्तित्व,
मग  हे पृथ्वीचे रहाटगाडगे कोण फिरवतो?
उत्तराची सुई तुझ्या दिशेनेच फिरते.
मग कल्पनेचा वारू उगाच उधळतो,
पुन्हा प्रश्नांचे॓  जाळे,
किती वेग वेगळ्या आकाराचे साचे असतील?
हाताखाली माणसाचा अगणित लवाजमा,
यात या जगातून तू नेलेले आमचे पूर्वज असतील का?
रोज क्ष माणसे/जीव  खाली सोडण्याचे त्यांना टार्गेट असेल का?
आणि किती तरी उत्तरा शिवाय प्रश्न भेडसवतात, 
आणि चक्रावलेला मेंदू,डोळे मिटून,
हात जोडून स्वगत पुटपुटतो.
विश्वास ठेव अगर ठेऊ नकोस
तो आहे... 

एक चमत्कारी गम्मत.



2 comments:

  1. खरंच,किती सुंदर कल्पना मांडली आहे ही जगाच्या रहाटाची ! मानावेच लागेल या जन्म देण्याच्या विश्वाच्या पद्धतीला. त्याच्या अनेक मदतीच्या हाताना.

    ReplyDelete

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...