Sunday, December 31, 2023

सूर्योदय २०२४

 

सूर्योदय २०२४

दिसला सूर्योदय २०२४ चा, नव्या वर्षाचा. 

पडले आणखी एका नव्या वर्षात पाऊल,

वाढून काय ठेवले ह्या वर्षाच्या ताटात 

पाहू या तरी रोज उगवणाऱ्या दिनकराच्या साक्षीने,

गेल्या वर्षांत विशेष काही घडले नाही 

जे काही घडले ते तसे काही वाईट नाही ना उत्तम,

आणि आपण तरी ह्या वयात अपेक्षा कराव्यात तरी कशाच्या 

प्रकृती, आरोग्य, खाणे, पिणे, सर्व काही ठीक ठाक 

मुले बाळे खुशीत कि आपण खुशीत,

काही मित्र, नातलग वर गेल्याच्या बातम्या 

हे अंगवळणी पाडून... मनात म्हणावयाचे 

राम भजन कर लेना रे भाई 

एक दिन जाना रे भाई.

नैराश्याचे नावही न घेणे

येणे, जाणे हे नियतीचे चक्र

थांबवणे न आपुल्या हाती.


माझ्या  खास मित्रांसाठी एक आधारित गाणे

कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ?

काल काय काय प्यालात , ते आठवतंय  का ?


अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, अहो चष्मेवाले तुम्ही

न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, मोबाइल वाले तुम्ही

सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?


काल म्हनं तुम्ही पार्टीला  गेला, 

रम व्हिस्की बिअर ने तहान  भागवलीत  का?

झिंग झिंग झिंगाट नाचलात  का?

सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?

पार्टीत म्हनं मोबाईल इसरून आला

इसरल्या ठायी, गावलं का न्हाई, 

आज तरि संगती आणलंय का ?

काल म्हनं तुम्ही पार्टी ला गेला, 

डोक्यातला ऐवज हरवून आला

आरंरं आज काय शिल्लक र्‍हायलंय का ?

काल काय ऐकलं ते खरं आहे का?


काल म्हनं तुम्ही पार्टीस  गेला, 

पिता पिता घोटाळा झाला

काय झालं पुढं, सांगा तरि थोडं आठवतंय  का ?

खाली नका बघु आता लाजताय का ?

आगं बया बया,काल काय ऐकलं ते खरं आहे का?



२०२४चे आगमन आनंदात साजरे करा.


Tuesday, December 26, 2023

आरक्षण,आरक्षण.आरक्षण.

 आरक्षण,आरक्षण.आरक्षण.



भटक्या,मागासलेल्या,आदिवासी व इतर जाती यांना ३०/% (?
आणि कुठल्या जमातीस २०%आरक्षण मग मराठ्याना ६०% 
का नको? 

हवे तर आम्ही न्याय निवाडा जाणत नाही, 
सरकारची चूक आम्ही भोगतोय.
आरक्षण  मिळालेच पाहिजे. 

प्रश्न: उच्च जातीयांनी काय करावे?

एकच उपाय सर्व उच्च जातीने 

आरक्षणाची जात पत्करणे 

पूर्ण महाराष्ट्रात आरक्षण.

तंटे, बखेडे मोर्चे उपोषण  

सर्व काही बंद.

आनंदी आनंद.  


Saturday, December 23, 2023

संकल्प ! २०२४

 संपले वर्ष २०२3

करा तयारी २०२४ च्या स्वागताची संकल्पाने!


का नाही? अहो सकारात्मक संकल्प करण्यास काय हरकत.

आता सकारात्मक  म्हणजे?काय? विचारू नका, सुरुवात करा स्वतः पासून...मी काय करणार? गेल्या वर्षातील चुका, अडथळे, कसे सुधारावेत ह्याचे नियोजन आता पासून करणार . 

 संकल्प !

आपल्या अवती भवोतीचे वातावरण बदलणे शक्य नाही तेथे चक्क डोळे झाक करणार.  म्हणजे काय?

राजकारण:  राज? का रण? हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार नाही  चर्चा करण्यात वेळ वाया घालवणार नाही.

कारण? सरळ साधे सोपे. मला त्याची ऍलर्जी आहे. संकल्प !

खेळ: सर्व पहाणार,  ह्या सारखे सुख नाही. जगभर अनेक प्रकारचे खेळ चालू असतात, हातात रिमोट असला की जगात कुठल्याही स्टेडियम वर असलेला सामना बघण्यात हाती असलेला रिकामं वेळ घालवणार.बसल्या बसल्या फेर जगात फटका. संकल्प !

व्यायाम: आपल्या प्रकृती प्रमाणे वयानुसार नियमित फेरफटका सकाळचा चालू ठेवणार खंड पडू देणार नाही.संकल्प !

वाचन : ह्या सारखा दुसरा मित्र नाही, वेळ मिळत नाही म्हणून कारणे न देता ही आवड पुढे चालू ठेवणार.काय वाचणार? काहीही हाती येईल ते, तशी पुस्तकालयात जायची आवडही आहे. सध्या तीन सम व्यावसायिकांनी लेखन केलेली वाचनात आहेत.संकल्प !

लेखन: आपले विचार मांडण्याची मला पहिल्या पासून आवड आहे. खचखोळ चालू राहीलच. माझ्या आनंदासाठी.

प्रवास: ह्या वर्षात परदेशगमन करण्याचा मनसुबा आहे, पाहू कसे जमते ते. संकल्प !

व्यवसाय: आले अंगावर तर घेईन शिंगावर ह्या तयारीत मी नेहमीच असतो.संकल्प !

शिक्षण: मी कधीच थांबलो नाही. सध्याच्या कॉम्प्युटरयुगात  माझ्या व्यवसायास लागणारे सर्व मी शिकत आहे व शिकत रहाणार. आज तरुण मुले जाहिरात व्यवसायातील एकमेकांशी सवांद साधतात त्यात भाग घेण्या एव्हडी तयारी नक्कीच ठेवणार. तसा फारसा  मागे मी नाही,कासवांसारखे(खऱ्या ) का असेना सशांच्या शर्यतीत खांदा लावून प्रयत्न नक्कीच करेन. संकल्प !

आहार : मागील पानावरून पुढे खाऊ हे तत्व जोपासणार. संकल्प!

करमणूक : ह्याला घरी टीव्ही असल्या कारणाने व आवड असल्याने ओटीटी मुबलक करमणूकिचे मोठे साधन, बातम्या पासून नवीन ओटीटी  रिलीजेस पहाण्यास कंटाळा येऊ न देण्यास वेळ काढणे.संकल्प !

विश्रांती: आवडता विषय नाही नुसता झोपण्या पूर्ती नव्हे तर भिर भिरत्या मनाचे गणपत वाण्या सारखे मनोरंजन करणे.संकल्प !

निद्रा : वयामुळे नाश पावत असणारी गोष्ट. पण त्यावरील देखील उपाय म्हणजे रात्री नाश पावलेला वेळ वाम कुक्षीत भरून काढणे.वाचलात माझा दिनक्रम/उपक्रम /स्वप्न/संकल्प !

संकल्प!  उद्याच्या श्वासाची शाशवती नसताना देखील... मनुष्य प्राणी केवळ ह्यावर जगतो.असो. 

नवं वर्षाच्या शुभेच्छा.

Thursday, November 30, 2023

राजकीय चिखल


राजकीय चिखल

महाराष्ट्र




राष्ट्र




अराज का? रण. 
सध्या देशात राजकारण म्हणजे दुसऱ्या पक्षावर चिखल फेकणे व आपण स्वच्छ असल्याचा दावा करणे.
राजकर्त्या पक्षा विरुद्ध "ब्र" काढलात की तुमच्या पाठीमागे इनकम टॅक्स,  ई डी, पोलीस,ह्यांचा ससेमिरा लागलाच समजा.कुठलाही टीव्हीचॅनल लावा ह्यांनी त्याला,फटकारकले त्यांनी त्यास धक्का दिला ,आज ह्याच्या घराची झडती,उलटतपासणी त्याची सुरु झाली चिन्ह खटला, पार्टी पळविणे, चोरांना आश्रय देणे, हिंदुत्व, आरक्षण मिळविण्यासाठी खोत जातीचे दाखले ह्या गोष्टी रोज दात घासण्या सारखे झाले आहे. एकूण संपूर्ण देश चिखलाने बरबटलेला आहे. 




दूर दृष्टी
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान,

कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान,
सूरज ना बदला,चाँद ना बदला,ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

आया समय बड़ा बेढंगा,आज आदमी बना लफंगा,
कहीं पे झगड़ा,कहीं पे दंगा,नाच रहा नर होकर नंगा,
छल और कपट के हांथों अपना बेच रहा ईमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

राम के भक्त,रहीम के बन्दे,रचते आज फरेब के फंदे,
कितने ये मक्कार ये अंधे,देख लिए इनके भी धंधे,
इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मशान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

जो हम आपस में ना झगड़ते,बने हुए क्यूँ खेल बिगड़ते,
काहे लाखो घर ये उजड़ते,क्यूँ ये बच्चे माँ से बिछड़ते,
फूट-फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

स्वर - प्रदीप कुमार
फिल्म - नास्तिक (1958)

Wednesday, November 29, 2023

"अलबेला"

 






हिंदी सिने सृष्टीतील संगीतकार म्हणून एक अढळ स्थान मिळविलेला "ध्रुव तारा'." 


रेल्वे स्टेशन मास्तरांचा मुलगा. तारुण्यात सिनेमा नाटकाचे वेड लागलेला "अलबेला". 

१७वर्षांचा, नववी पास घर सोडून कोल्हापूरला येतो लवकरच "नागानंद" सिनेमात भूमिका पटकावतो तोंड घशी पडल्यावर हिरो होण्याचे वेड सोडून मुंबईचा रस्ता धरतो. आता तो आपल्या दुसऱ्या प्रेमाकडे "संगीता "कडे वळतो.

गंधर्व महा विद्यालयात विनायक बुवा, गोविंदराव पटवर्धन ह्यांच्या कडून शिक्षण घेतो व सिनेमात छोट्या भूमिका जशा मिळतील तशा करतो. सिनेमाची कधी न ऐकलेली  नावे 'आत्मा तरंग' "सैदे हवंस' १९३६ /३७.


ओळखलंत का कोण? नाही ना पुढचा प्रवास वाचा. 

मिनर्व्हा थिएटर मधील संगीतकारांना पेटीची साथ करता करता एक दोन तामील फिल्मना संगीत देतो.

ह्या अलबेलाच्या उडत्या गाण्यांना वेस्टर्न गाण्यांचा साज होता, तसेच हिंदुस्थानी गाण्यास रागदारीची झालर होती. ओळखलंत का? नाही मग चला पुढे, ह्याच्या संगीतास तारुण्याचा उन्माद ठासून भरलेला त्यांनी सेक्साफोन च्या जोडीला गिटार आणि माऊथ ऑर्गन ची जोड देऊन हा उन्माद खरा ठरवला ."आना  मेरी जान" "शोला जो भडके" ह्यात बॉन्गो, सेक्साफोन वापरून रॉक म्युझिक ची ओळख बॉलीवूड मध्ये आणली. पहा आठवून " इन मीना डिंका " सारखे अजरामर गाणे तुमचे पाय आपोआप ठेका धरतील. १९४२ च्य सुमारास हे साहेब त्याकाळातील विनोदी अभिनेता भगवान दादांना भेटले  आणि चमत्कारास  सुरुवात झाली केवळ वयाच्या २४ वर्षी,  "ललकारी," "सम्राट चन्द्र गुप्त", "भक्तराज" फिल्म्स ने त्याच्या उदयास सुरुवात झाली, भक्तराजच्या प्रोड्युसर जयंत देसाई यांनी  त्याचे नावच बदलून टाकले मग काय विचारता सूर्यउदय झाला, आता तरी ओळखलंत,  

बरोबर! दुसरे तिसरे कोणी नसून हा 'अलबेला' म्हणजे सी. रामचंद्र सर्वांचे लाडके अण्णा.  

अण्णा प्लेबॅक देताना मात्र खरे नाव 'चितळकर' लावीत.

(जो पर्यंत मी नाव सांगत नव्हतो तो पर्यंत "अरे ""कारे",  मध्ये मी उल्लेख करत होतो जसे नाव उलगडले तसे माझ्या करवी आपोआप आदरार्थी सम्बोधन होऊ लागले.) 

अण्णांचा आवाज माझ्या तारुण्यात सुरु झाला. मी १० वीत होतो इंपिरिअल थेटरला भगवान दादांचं अलबेला, मी अकरावी पास होईपर्यंत ठाण मांडून बसला होता. 

अहो गाणी आठवा... 'भोली सुरत, शोला जो भडके, धीरेसे आजारे..." सिनेमातले प्रत्येक गाणे हिट अण्णांच्या म्युझिक बरोबर भगवानदादा देखील उदयास आले. 

अण्णांचा दबदबा वाढला तो "अनारकली" नन्तर व तेव्हां खऱ्या अर्थाने "सी.रामचंद्र" हे नाव "झाले बहू होतील बहू " परंतु ह्या सम हा!" यादीत बसले .   अनारकली नन्तर अण्णा आणि लता दीदी हि जोडी अतूट झाली. लंडन मधील एका पत्रकाराने "अनारकली" पहिल्यांनंतर लिहिले कि सिनेमातील हिरोईन एखाद्या स्वर्गातल्या परी सारखी गायली, त्या बिचाऱ्याला लता दीदी माहित नव्हती.

अण्णांची महती वाढतच गेली त्यात लता दीदीची साथ.  नवरंग, स्त्री, अनारकली,आझाद, नास्तिक, पतंगा,पैगाम,अनेक बहारदार संगीताने नटलेले चित्रपट ८०% गाण्याच्या मदारीवर चालले अहो हेच ते अण्णा ,"झाले बहू होतील बहू...अण्णांचा दरारा बॉलीवूड मध्य वाढू लागला, एस डी  बर्मन सारख्या नामी संगीतकारास देखील काही बदल सुचवलेत. तुम्हाला " थन्डी हवाये" गाणे आठवते का? त्यात "ला ला ला' ची जोड अण्णांनी सुचवली व गाणे हिट झाले असे हे "झाले बहू होतील बहू...  अण्णा.

१९५० चे दशक ह्या अलबेलाने गाजवले, अण्णांनी त्यांच्या उडत्या व भावूक गाण्यांनी देश गाजवला.

ह्या सर्व शिखरावर त्यांनी कळस चढवला तो १९५३ साली प्रजासत्ताक दिनी झालेल्या सोहळ्यात अजरामर गाण्याने. लता दीदी च्या गळ्यातून उतरलेली  "ऐ  मेरे वतन के लोगो" आर्त हाकेने पंडित जवाहरहलालजीनी देखील अश्रू ढाळले   आज ७० वर्षे, दर २६ जानेवारीस गल्लो  गल्ली  हे गाणे घुमते, अंगावर शहारे आणते, केवळ अण्णा तुमच्या संगीताने.


अण्णा तुम्ही माझ्यासाठी मात्र सदैव "झाले बहू होतील बहू.... " 




Sunday, November 12, 2023

दिपावली -

  दिपावली 



तुमची, माझी, आपली 

आली, आली,आली, यंदा बार उडवीत आली,

 

हसत, खुशीत, आनंदात, आली वाजत गाजत !

झगमग झगमग   झगमगाट पणत्यांचा,

दारोदारी पसरीत गालिचे रांगोळ्याचे !


ऐका गम्मत आमुच्या  घरची,

वर्शो न वर्षे न बदले काही  


मिट्ट काळोखी डोळे चोळीत 

पहाटेचे स्वागत करती भाव गीतांनी  


तेल उटणे लाउनी झाली तयारी, अभ्यंग स्नानाची

लहाना पासून मोठ्या पर्यंत झाली सज्ज, 

नटुनी तयार,घाई फराळ खाण्यासी


 लाडू, चकली, करंजी, अनारसे आणि चिरोटे, 

आईने, सजवली  फराळ ताटे,

सरसावून हात मारीती सारे  फराळावरी. 


आजीने उजवल्या पणत्या  अंगणात,

केले वाटप बाबांनी फुलबाजा,अनाराचे, 

 प्रसन्न होई मन पाहुनी, कारंजे, फुलबाजे फुलताना, 

 पाहून भुई चक्राला, सर सर  फिरताना वाटे, 

असेच असावे, चक्र सुदर्शन त्या गिरीधराचे. 

आली मावशी आली आत्या, 

पाहून मामा मामीला,

फुलली कळीआजीची, 

पाहिले तीस मी पदराने,

डोळे  हळूच टिपताना

गजबजले घर, अंगण, गप्पा शप्पाने . 

आली दिपावली घेउनी ४ दिवस 

कौटुंबिक जिव्हाळ्याचे,

ना समजले न उमजले 

कधी  गेले ४ दिवस मजेचे


हिरमुसली आजी एकली विचाराने 

 पाहीन का मी हा आनंद येत्या वर्षी 

 भरल्या डोळ्यांनी. 


जमले कुटुंब हळू हळू विखुरले

घर गजबजलेले, आता शांत झाले,

आली आली गेलीगेली दिपावली, 

आनंद पसरून.


Tuesday, October 31, 2023

ह्याला जीवन ऐसे नाव...

 गेल्या पंधरवड्यात कॉलेज मधील वर्गातीलएक मित्र व एक मैत्रीण गेल्याचे फोन वर

कळले. मेंदू सररर करून वर्गात जाऊन बसला, 
सर्व वर्गात नजर फिरली व गेलेल्या 
मित्राच्या जागेवर खिळली,. अर्थात त्याच्याबरोबर 
घालविल्या दिवसांची आठवणही उजळली. 
बातमी आलेली मैत्रीण खूप हुशार होती.
ह्या बातम्या आता अंगवळणी होत होत्या,

ह्या वरून मनात एक वावटळ  उठले.
वेग वेगळ्या वयात येणाऱ्या बातम्यांचे महत्व, 
स्वरूप त्याच वयात कळण्या सारखे असते

वय वर्षे ५/६ 
झाली कि अवती भवतीच्या
ह्या वयात आपल्याला वाढ दिवसाच्या बातम्या 
कानावर येतात आज बबनचां
वाढदिवस उद्या चिंगीचा... आनंदि आनंद 

वय वर्षे १० ते १५...
आर्या पहिली आली, विनोद ला ९०%
आशीर्वादला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला,
मालिनी चे अरंगेत्रम शुक्रवारी... 

वय वर्षे १६ ते २०...

देव आनंदचा ‘काला बाझार,’ मेकांनाज गोल्ड 
कसला तुफान, हिच्कोक भन्नाट डिरेक्टर,
नौशादने कसले म्युझिक दिलय यार...
अशोक इन्जिनिअरिन्गला गेला...
अनिल मेडिकलला जायचे म्हणतोय...

वय वर्षे २२ ते २५...

शिला, राम जेठमलानी बरोबर काम करते,
निर्मला मास्टर्स करायला यु एसला
गेली, वाडकरांचा सुरेष शिक्षण सोडून
गातो म्हणे,गणेशचे लग्न ठरलय,
रघु आणि मैना पळून गेले...

वय वर्षे २५ ते ३०...
सन्नी, मोहन,गंगा... जवळजवळ
सर्वांची लग्न झाली, आशुतोष नेहमीच
सर्वापुढे त्याला दोन लेकरे आहेत आणि
बंगळूर मध्ये स्थायिक देखील झाला...

 वय वर्षे ३५ ते ४५,,,
 
किशनचा वरूण लार्सेन मध्ये लागला,
जामसंडेकर अमेरिकेत सेटल झाला,
परवा गौरीच्या मुलीचे लग्न खांडेकरच्या
मुलाशी ठरले, राघव च्या पार्टीत कसली 
धमाल केली, जुन्या आठवणी गप्पाना उत
आला पहाटेचे ३ वाजले... बापटची आई वारली, 
सारंग चे वडील १५ दिवसापूर्वी गेले...

वय वर्षे ५० ते ६०...
 
साठेला प्यारेलेसीस झाला उजवी बाजू
कामातून गेली, काशीला डायाबेटीसने
फुल ग्रासलेय, हरीश आता मोदीचा
टेक्निकल सल्लागार झालाय वट वाढली 
लेकाचे करून करून भागले आणि...
वृंदा, भारत भारतात परतले 
पुण्यात सेटलझाले,शामच्या 
मुलाने आई बापाला केसरी 
मधून जग फिरवले


वय वर्षे ६५ ते ७५...

मधुकर गेला...हरीचे पण खरे नाही
शालिनी शिव गेल्या पासून एकटी पडली
घनश्याम वृद्धाश्रमात राहायला गेला,
मंदाकिनी मंदारचा आजार काढून थकलीय...

आपले काय?
आतापर्यंत तरी आल वेल...! 

अशा ह्या वयोपरत्वे बातम्या माझ्या
कानावर पडत गेल्या व त्यांचे ह्या 
वावटळीत शब्दांकन करावेसे वाटले.

ह्याला जीवन ऐसे नाव...



Monday, October 23, 2023

|| दसरा ||

 



सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।|
बहीण काशी ओवाळी मग त्याला ।| 
||दसरा सण मोठा,  नाही आनंदा तोटा||

माझ्या दसऱ्याच्या काही आठवणी.   


आमचे अण्णा आम्हाला दसऱ्यास सकाळी उठवताना " सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ,
 

त्या काळात आमच्या कडे आचार्य अत्रेंचा " मराठा" वर्तमान पत्र येत असे.  मंत्री मोरारजी देसाई यांच्यावर लिहिलेल्या 
आपल्या टीकेनी भरलेल्या दसऱ्याच्या अग्रलेखास अत्रेंनी सुरवात सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ह्या वाक्याने केली होती ही आठवण.
दसऱ्यास झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण अण्णा स्वतः दरवाज्यास बांधीत. आजही  माझ्या दरवाजात तोरण बांधताना डोळ्यासमोरून ही आठवण सरकते. दसऱ्याचे महत्व पांडवानी शमीच्या झाडावरील लपविलेली शस्त्रे उतरवली होती, त्यामुळे दसऱ्यास शमीची पाने एकमेका सोने म्हणून देण्याची प्रथा पडली असे आईने गोष्टीत सांगितल्याची आठवण.
ह्या दिवशी होणाऱ्या जेवणाची आठवण. वरण भात,वालाची उसळ,काकडीची कोशिंबीर, हिरवी कैरीची चटणी, पापड, आणि जेवणातील महत्वाचा व माझ्या आवडीचे श्रीखंड, किवां मसाला दूध  आजही मैना भुलुंगा.
आमच्याकडे तसे येणारे नातेवाईक फार कमी त्यामुळे सोने आम्ही भावन्डे आप आपसात वाटत असू,पुढे जे जे  त गेल्यावर मित्रपरिवारात वाटण्यास सुरवात झाली, आमचे एक सर मात्र सोन्या ऐवजी ग्रीटिंग कार्ड्स करायचे व आपल्या लाडक्या विद्यर्थ्यांना पाठवीतही आठवण. आमच्या दादाचे लग्न दसऱ्याचे ही  एक आठवण,  दसरा आला कि गेली काही वर्षे मोबाइल वरून सतत टिंग करत कोणी ना कोणीतरी शुभेच्छा पाठवीत  रहातात त्यांना वयोपरत्वे विसरू नये म्हणून लगेच आपल्या बाजूने रिटर्न सदिच्छा न विसरता न दुखवता पाठवण्याची आणखी एक आठवण, जी विसरून चालत नाही, मोबाइलच्या जन्मापासून सर्वाना हायसे वाटले असावे घर बसल्या सर्वाना सदिच्छा पाठवणे सोपे झालेय. ते देखील न भेटता. तेव्ढ्यावरून होणाऱ्या गैर समंजस टाळण्याची आठवण.
थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट. आठवणी म्हणजे दसरा हे समीकरण माझ्या साठी.थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट.   
    

* दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.





चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो.चातुर्मासातअश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते

*
वरील माहिती गुगल च्या साहाय्याने घेतली आहे.

Saturday, October 21, 2023

महाअष्टमी



महाअष्टमी

आमच्या आई वडिलांनी आम्हा मुलांना कुठल्याही प्रकारे धर्म ह्यावर कधी भाषण दिले नाही किवां आपण हिंदू ते मुसलमान , ते ख्रिस्ती, ते पारशीअसा भेद भाव करणे हि शिकवले नाही त्यात हिंदूंचे जाती विभाजन देखील शिकवले नाही.घरात एक अण्णांचे कपाट होते त्यात वरच्या खणात रामाचे चांदीचे सिंहासन होते त्यात अण्णांचे राम पंचायतन चे एक नाणे होते ज्याची अण्णा आंघोळीनंतर  पूजा करीत आम्हाला कधीही सांगितले नाही कि तुम्ही रोज हात जोडलेच पाहिजेत वगैरे त्यानी शिकविलेला श्री राम, श्रीकृष्ण, व इतर दोन श्लोक मात्र नित्य नेमाने झोपण्यापूर्वी कपाटा  समोर उभे राहून म्हणावयास शिकविले होते तोच आमचा देवाशी कॉन्टॅक्ट,बाकी मार्केट मध्ये जाताना मारुतीचे एक देऊळ, व रस्त्यात झाडाला टांगलेले साई बाबा ह्याना लांबूनच नमस्कार करणे. तो देखील देखल्या देवा ... एक हात छातीस लावून. 

थोडक्यात सांगायचे तर आम्हा मुलांना फारशी सणावारांशी ओळख नव्हती.( म्हणजे सणाचे महत्व किवां का साजरे करतात, इतिहास वगैरे ) काही सण आई गोड पदार्थ करायची म्हणून कळायचे. होळीला पूरण पोळी, संक्रातीला तिळाचे लाडू, दसऱ्याला मसाले दूध, दिवाळीला फराळ वगैरे. 

अरे हो आमच्या घरी एक पुस्तक होते ते घरात कुणी कुणी वाचले होते कोणास ठाऊक.मी तर नाहीच नाही,पुस्तकाचे नाव होते हिंदू सण व व्रते, माझ्या लक्षात फक्त त्याचे कव्हर आहे. पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंड वर एक वडाचे झाड व त्या भोवती फिरणाऱ्या बायका, आईनेच हे आणले असावे तिला वाचनाची खूप आवड. 

असो विषय थोडा लांबला.

माझे लग्न ठाकरे कुटुंबात झाले व माझी खऱ्या अर्थाने देवांशी ओळख झाली. मला सर्व सण व्रते यांची माहिती महती समजली. त्यातील नवरात्री एक महत्वाचा भाग. त्यांच्या कडे म्हणजे सासरी पहिल्या रात्री पासून सणाला सुरवात व्हायची म्हणजेच घट बसायचे,रोज माहेरी जाणे शक्य नसल्याने अंजली आता घरात तिच्या परीने देवीची पूजा, पोथी वाचन ९  दिवस करते, त्याबरोबर देवाचा प्रसाद रोज केला जातो. अष्टमीला मात्र आम्ही माहेरी, सासरी, गेली ४६ वर्षे जातोय.ह्या दिवसाचे महत्व मी अलीकडे गुगल करून माहिती केले. अंजलीच्या माहेरी अष्टमीला घरी देविचा  प्रसाद म्हणजे मटण, कलेजी. कोलंबी, मासे, गोडाचे पदार्थ ( ह्यातील अर्धा मासाहारी प्रसाद अंजली करते )ह्याने पूर्ण , तुडुंब, भरलेली परात येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत,सर्वानी त्यास हाताने स्पर्श करावयचा असतो त्यानंतर सर्वांचा ९ दिवसाचा उपवास सुटतो. हे माझयासाठी लग्नानंतर नवीनच होते, आता हि प्रथा बऱ्याच घरातून असते हे समजले. 


अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला 
महाअष्टमी (Mahaashtami) असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेचे आठवे रूप गौरीची पूजा केली जाते.  गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. नवरात्रीत महाअष्टमीला इतके महत्त्व का आहे? पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने  चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असेही म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना  गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते.


*वरील माहिती गुगल च्या साहाय्याने घेतली आहे.

Tuesday, October 10, 2023

'खचखोळ' {काही निवडक}-- 2


 

गेली ३/४ वर्षे लिहलेल्या ब्लॉग ची उजळणी करताना मला असे जाणवले की,बऱ्याच ब्लॉग मध्ये कांही कळत नकळ्त बरे विचार मांडले गेले आहेत म्हणून हे निवडक विचार पुन्हा एकदा मांडण्याचे धाडस. 



मन स्वछ असणे हे  काच स्वछ ठेवण्या सारखे.

मनाला स्थिर ठेवणे हे श्वास बंद करण्या येव्हढे कठीण.


रद्दी माणसांची व्याख्या काय? 

करायचीच  झाली तर "गरज सरो वैद्य मरो" हि व्याख्या.


कशा वेळ  फुकट घालवावा
संगीताच्या मैफिलीना
असता कानी स्मार्ट फोन! 
नाही हशा, नाही सम्भाषण 
विसरुनी भाषा मैत्रीची,
अवगतली मूक भाषा    
एकत्र आहोत आम्ही शरीराने!
करावयाची काय दुसरी भाषा
असता कानी स्मार्ट फोन! 

आणखी एक दिवस उजाडला 

हात लिहिताना नाही थरथरला!

हस्ताक्षर उगाचच हसू लागले.


सारे  कसे रम्य पण प्रसन्न,

पापण्यांत साठवून हे तारांगण,

शिरलो मी कुशीत गाढ निद्रेच्या.


नाही. त्याला देश
नाही वेश नाही,
रंग रूप तो ठरवेल तेच
आपली भेटीची वेळ स्वतः तो ठरवितो.
एका लाटेत शेकडो,हजारो, लाखो
 बासरीवाल्या सारखा तो 
एकाच वेळेस घेऊन जातो.






Tuesday, October 3, 2023

आठवणीं

 






पहात तुझ्या कडे एकाग्रतेने.

मनातील वादळ शमवावेसे  वाटते.

उगाच, असंबंधपणा, लिहिताना डोकावतो.

आपले  नाते काय? एक न सुटणारा गुंता होय, 

वर्षे सरली पण गुंता तसाच, 

कधीही न सुटणाऱ्या भूत काळातील गाठी,

तुझ्या टोका पासून 

माझ्या टोकापर्यंत 

न सुटणाऱ्या 

आठवणींच्या गाठी. 

एक गाठ सुटल्यावर, 

पुढील गाठ सुटेपर्यंत, 

आठवणींच्या वादळाचे गलबत 

हेलकावे खात राहते  

ना जात पुढे ना पाठी,

अचानक भोवऱ्यात सापडते. 


आठवणी त्या भोवऱ्यात गोल गोल 

फिरून विरून जातात.

बऱ्याच गाठी सुटत नाहीत,

सुटू नयेत हाच तर मनसुबा 


 

झाले बहू... शम्मी कपूर








झाले बहू... ही ब्लॉगमाला माझ्या १५ वया पासून २१ वया पर्यंत लागलेल्या व्यसनांतील मोजके बॉलीवूड हिरो, हेरॉईनस, म्युझिक डायरेक्टर, डायरेक्टर्स, ज्यांनी मला त्यांच्या विविध कलागुणाने आकर्षित केले व आनंद दिला त्यांना समर्पित,


याहू!... याहू!
बरोबर ओळखलंत, 
एकमेव शम्मी कपूर.
१९५८ मी ९ वित्त होतो,
सुपर सिनेमा 
मी माझे तीन सिनेमा वेडे मित्र.   
१२ आण्याचे तिकीट.   
स्क्रिन पासून ३ री लाईन. 
मान डोळे वरती.
इंडियन न्युज संपते  न संपते तो... 
सेन्सॉर सर्टिफिकेट,
सिनेमाचे नाव "उजाला" वाचून कर्कश शिट्या,
पिक्चर सुरु,  कानठळ्या बसण्या एव्हढ्या शिट्या,
रामू { शम्मी कपूर ), छबिली (माला सिन्हा) जानि व्हिलन कालू ( राज कुमार ) , 
रामूची ३ भावन्डे, हिंदी सिनेमात जिचे हसू कोणीही न पाहिलेली  सदा रडणारीआई,{लीला चिटणीस ) असा नेहमीचा संच 

रामू सज्जन, कालू च्या दोस्तीस बळी पडून  वाईट मार्गास लागतो,बहिणीस अपघात झाल्यावर सुधारण्याचा प्रयत्न करतो ,,,, वगैरे, वगैरे
आता रामू छबिली जोडीचे गाणे पडद्यावर येते आमच्या आजू बाजूचा पब्लिक वेडा होतो...

गाणे: "झूमता मोसम मस्त महिना",समोर शम्मी कपूर, माला सिन्हा

पब्लिक सीटवर उभे, केवळ विद्यार्थी म्हणून आम्ही स्वतःला आवरून बसून राहिलो..
काय सांगू तुम्हाला अहो शम्मी कपूर ने ह्या एका गाण्यावर लाखोंनी फॅन्स कमावले ते कायम राहिले त्यात अस्मादिक हि सामावले.
हे गाणे जरूर बघा बघा बघा.
सिनेमातील अविसमरणीय क्लायमॅक्स सिन, 
कालू आणि रामू मधील फाईट. 
दोघे एका हात गाडीच्या दोन बाजूस,
एक मेकास खो खो खेळातील हूल देत,
अचानक कालू हातगाडीवर उडी मारतो 
खिशातून सर्र्र्र करून चाकू काढतो,
रामूला उद्देशून जानी... आणि... 
कालूच्या बाजूचे प्रेक्षक, शिट्यानि 
थेटर दुमदुमून सोडतात,
राजकुमारला फॅन्स मिळतात, 
सिनेमा सुटल्यावर जानि...जानि ...
जयघोष

शम्मी कपूरचे सर्व सिनेमे.  मी पहिले.यादी खूपच मोठीआहे तरी पण नोंद केल्याशिवाय रहावत नाही.

१९५६ तुमसा नही देखा 
अहो ह्या सिनेमाची सुरवातच 
शम्मी च्या बूट हलवताना होते
आणि अमिताला पाहून गाणे 
युं तौ हमने लाख हंसी देक्खी है..
पब्लिक वेडा,मी...

१९५८ उजाला
याला याला दिल ले गइ...
१९५९ दिल देखे देखो.
दिल देखे देखो

१९६१ जंगली 
याहू याहू ... जरूर पहावे असे, त्याचे कुठलेही गाणे घ्या तुम्हाला आनंद  मिळताच पाहिजे.  

एक छोट्टासा किस्सा ( कौतुक नाही}साल १९८७/८८  
माझा मुलगा अपूर्व ८ वर्षाचा शाळेतून घरीआला कि पलंगावर बसून टॉम न जेरी वगैरे कार्टून व्हिडीओ पाहायचा त्यात घरातील 'जंगली' चा व्हिडीओ देखील लावायचा, त्याने जवळ जवळ ६५ वेळा ''जंगली' केवळ शम्मी कपूर साठी पाहिलाय. बर्याच वेळेस तो कॅसेट लावून बाहेर बसायचा पण आत कुठला सिन चाललाय ते डायलॉग सहित सांगायचा विचारले कि सांगायचा याहू गाणे बघायला मजा येते. असे हे गाणे,

यादी 
१९६२ प्रोफेसर 
१९६३ चायना टाऊन 
१९६३ ब्लफ मास्टर, राज कुमार,काश्मीर कि कली, जानवर, तिसरी मंझिल ,इव्हिनिंग इन पॅरिस, ब्रम्हचारी, प्रिन्स,अंदाज लिस्ट न संपणारी     

गोविंदा आला रे आला ...

गेली साठ वर्षे प्रत्येक दहीकाल्या च्या दिवशी वाजलेच पाहिजे ह्या गाण्याचा विडिओ पहा अहो शम्मी चा नाच बघा.
त्याच्या नंतर अनेक हिरोनी ह्या गाण्यावर नाच केले पण नाही नाही कोणीही जवळ नाही पोचले, पोहचणेअशक्य,अशक्य.
शम्मी कपूरचा कुठलेही गाणे घ्या त्यातील नाच पहा कुठंही लैंगिक हातवारे दिसणार नाहीत उलट त्यात तो रमलेला 
उत्तम डान्सर पहायला मिळतो त्याची  देहबोली आपणास आपलेसे करते व त्यामुळेच त्याचे फॅन खुश होतात.म्हणूनच तो या सम... 

यू ट्यूब वर हे गाणे पहा.
हिंदी स्क्रीन वरील एकमेव ६ फूट  देह, 
त्याची अदाकारी नाच अनेकांनी प्रयत्न करून ही जमले  नाही म्हणूनच तो या सम... 

निळसर हिरवे डोळे,चेहऱ्याला साजेसे केस, देह, केवळ हिरो होण्यासाठीच ईश्वराने जन्मास घातलेला, तो दुसरा कुठल्याही व्यवसायात शोभालाही नसता. म्हणूनच तो या सम...

आज पावेतो बॉलीवूडमध्ये पैदा नही हुआ ना होगा.म्हणूनच तो या सम...

आपल्या खात्री करीता यु ट्युब वर  शम्मी कपूर ची गाणी पहा व त्याच्या  अदाकारीने तुम्ही नकळत फॅन व्हाल. आजच्या एका हीरो चे नाव घ्या कि जो शम्मी कपूर सामोरे उजवा दिसेल /ठरेल.
म्हणूनच तो या सम...

त्याच्या अदाकारीमुळेच शम्मी कपूर अमर राहील, 
म्हणूनच तो या सम...

 




      


Saturday, September 9, 2023

पितृछत्र

 

ऐन तारुण्यात पितृछत्र हरवले,
पितृछत्र म्हणजे काय
याची जाणीव झाली.
रोज दिसणारी व्यक्ती अचानक
कायमच्या सुट्टीवर जाते,
हाक मारणारा आवाज
ऐकूच येत नाही आशीर्वादाचा हात
डोक्यावरून फिरत नाही
गाऱ्हाणे ऐकणारे कान बहिरे होतात
अशाप्रसंगी...हृदयात जपलेल्या
पितृ प्रतिमेशी स्वगत करून
आयुष्याचे गाडे ढकलावे लागते.
आज बघता बघता...
५६ वर्षे उलटली.

Friday, September 8, 2023

मी पाहिलेलाअनभिषिक्त राजा


   मी पाहिलेला अनभिषिक्त राजा

जे जे  मध्ये १९६२ मध्ये प्रवेश करून २/३ महिने गेल्यावर वर्गातील सर्व मुलांची एकमेका सोबत ओळख झाली होती.

माझी काहीं बरोबर तोंड ओळख, काहीं बरोबर छान मैत्री.

अगदी नावेच घ्यायची झाली तर मित्र म्हणजे राजाराम भानजी, चंद्रकांत शेठ, जगदीश पुळेकर, दिनेश परुळेकर,सुहास तवकर,सैनी,भाटलेकर आणि मुलींमध्ये आशा पोतदार, सरला पप्पू , शामला हेमाडी, चित्रागुप्ते , नीलम गडकरी, आणि बऱ्याच मुली. ह्या सर्व मित्रां मध्ये जगदीश,दिन्या बरोबर एक हसरा हँडसम चेहेरा मी बघत असे ज्याची माझी  तोंड ओळख  होती. मला त्याचे स्मित खूप प्रसन्न वाटायचे. हा चेहरा वर्गात दिवस भर नसायचा. मधून मधून गायब व्हायचा, नंतर मला कळले तो बाहेरची कामे करतो. तो हसरा चेहरा म्हणजे राजा. 

६३ मार्च मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत मी नापास झालो,  मी पुन्हा ऍडमिशन घेतली माझ्या बरोबर नापास झालेली मुले देखील पुन्हा वर्गात दिसली. तो हसरा चेहरा म्हणजे राजा देखील दिसला. मला थोडे आश्चर्य वाटले, मी जग्याला विचारले तेव्हां मला कळले की राजा परीक्षेस बसला नाही. 

हा  नवीन वर्ग व त्यातील विद्यार्थी पहिल्या दिवसापासून एकमेकांशी जुनी ओळख असल्या प्रमाणे मित्र झाले. आम्ही सर्व एकीने वागत असू. एक दुसऱ्यास मदत करणे हा धर्म होता. आमच्यात पुरुष स्त्री हा फरक नव्हता. दांडी मारून सिनेमाला जायचे तर पूर्ण वर्ग  एकत्र जाई. वर्गात मस्ती करायची तर ती देखील एकत्र, ह्यात महत्वाचे म्हणजे आम्ही सर्व सबमिशनला पक्के होतो, मग काम चांगले वाईट का असेनात ते वेळेवर देणे सर्वांसाठी महत्वाचे. त्यामुळे आमचा वर्ग सर्व सरांचा आवडता. ह्या सर्व गोष्टीत राजाची साथ होती.राजा मात्र पूर्वी सारखाच महिन्यातून आठवडा भर तरी गायब असे.जस जशी राजा बरोबरची माझी ओळख वाढली तसे राजा बद्दल असलेले कुतूहल उलगडू लागले. राजा आपल्या शिक्षणाचा व इतर खर्च स्वतः फ्री लान्स कामे मिळवून करत असे. त्यासाठी तो वेळोवेळी वर्गात गैरहजर असे, आपल्या परिस्थितीचा मागमूस मात्र त्यांनी कोणाला कधीच  लागू दिला नाही. राजा फार जिद्दी व अपार  मेहनत करणारा, मित भाषी, प्राध्यापकांचा आवडता. त्या वेळेस तो आचार्य अत्रे, एस एम जोशी, जॉर्ज फर्नांडिस ह्या सारखी मोठी राजकीय नावे घेत असे, मला त्याचे कौतुक वाटायचे. (ह्या व्यक्तीं बद्दल गेल्या २/३ वर्षात राजाच्या ब्लॉग मधून बरेच बौद्धिक मिळाले.)

फर्स्ट  इयर ते फोर्थ इयर, राजा ढगा आड गेलेला चन्द्र पुन्हा ढगाबाहेर डोकावतो, तसा कधीकधी दिसायचा. आला की सर्वांमध्ये मिळून मिसूळून असायचा. राजा कुठे रहायचा मला तरी माहित नव्हते ते अलीकडे मला त्याच्या एका लेखात उलगडले. मी मात्र राजा दिसला की कुतूहलाने त्याचे नवीन अनुभव व गोष्टी ऐकण्यास उत्सुक असे. 

असो ४ वर्षे कशी सरली कळाले नाही वर्गातील ४०  मुले ४० दिशाना नाहीशी झाली. आम्ही काही मुले मात्र शिवाजी पार्कच्या नाक्यावर/ कट्ट्यावर भेटत असू. अचानक एक दिवस दिन्या परुळेकरने बातमी आणली राजा कॉलेज मध्ये लागला. 

मधली अनेक वर्ष राजाच्या बातम्या मिळणे कठीण झाले. कारण होते गव्हर्नमेन्टला आलेला झटका, एकाच शहरात न शिकविता प्राध्यपकांनी महाराष्ट्रातील असलेल्या  सर्व आर्ट स्कूल मध्ये शिकवणे जरुरीचे आहे. ज्याना हे मान्य नव्हते त्यांनी ह्या बदलीच्या संगीत खुर्चीत भाग न घेता नोकऱ्या सोडल्या. पण राजा पुढे ध्येय होते, त्याची ट्रान्सफर नागपूरला झाली त्यांनी ती स्वीकारली, त्याची खुशाली मिळणे  कठीण झाले.याच सुमारास काही वर्षात जुने प्राध्यापक निवृत्त झाल्याच्या बातम्या मिळत होत्या, 

 राजा डीन झाल्याची बातमी ऐकून शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरील आम्हा सर्वाना  आनंद झाला. राजाचे गुण गान सुरु झाले, प्रत्येकानी आपले राजाबरोबरचे नाते कसे होते ह्याचे कथा कथन देखील केले. नक्की असे आठवत नाही पण मी फोन वर अभिनंदन केले असावे. राजाने जिद्दीने ते सिंहासन जिंकले होते. आम्हा वर्ग मित्राना नुसता आनन्द नाही तर अभिमान वाटला.

राजाने सिहांसनाचा माज कधी दाखवला नाही.

राजा मित्रांना विसरला नाही,एके संध्याकाळी आमच्यासाठी त्यांनी मित्र भोजन आयोजित केले.त्याच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट सांगत होते मी हे जिंकले आहे. तो आता डीन असल्याने,पूर्वी ज्या बंगल्यात किपलिंग, जंगल बुक चे लेखक यांचे वास्तव्य होते तेथे रहावयास लागला होता. आम्हा सर्वाना त्यांनी बंगल्याची एक छोटीशी गायडेड टूर पण करवली.

राजाच्या बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे, गजानन किर्तीकर, सुरेश जैन, प्रतापराव पवार, एस.पी. गोदरेज, टाॅम आल्टर, सारखी मोठी नावे पाहूणचार घेऊन गेली होती, अतूल भातखळकर, माधवराव गडकरी, कुमार केतकर, अशोक जैन, कुमार कदम, सुधीर नांदगावकर, तसेच किरण ठाकूर अश्या पत्रकारांचाही ये जा सतत सुरु असे. सौ.भारती एक उत्तम होस्ट, पाहुण्यांचे स्वागत,सरबराई उत्तम करण्यात पटाईत. 

 १९९१ ते २००१ पर्यंत राजाने उत्तम प्रकारे अप्लाइड आर्ट भागावर राज्य केले, व १ सप्टेंबर २००१ साली म्हणजे त्याच्या ५७ व्या वाढदिवशी निवृत्ती घेतली,  ह्या सर्व काळात राजाने ४/१  एक पुस्तके लिहीली.

आज राजा एक अतिशय उत्तम लिखाण, त्याच्या ब्लॉग द्वारे प्रसिद्ध करतो.  त्याच्या एव्हढे उत्तम व्यक्ती वर्णन व स्मृती चित्रे मी आजतागायत वाचलेली  मला आठवत नाही.राजाला एक दैवी देणगी आहे ती म्हणजे अफाट स्मरण शक्ती. लहानपणा पासून ते आज ७० री मध्ये  देखील सर्व गोष्टी आठवतात. फोटोग्राफिक मेमरीचे त्याला वरदान आहे. 

राजा आणखी एका बाबतीत नशीबवान आहे त्याला अनेक थोर मोठ्या व्यक्ती जवळून पहायला मिळाल्या त्यांच्या बरोबर संवाद साधण्यास देखील मिळाला हे त्याच्या लिखाणात दिसून येते. तो केवळ वरवर गाठी भेटी न लिहिता त्या व्यक्तीच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतो. आज पर्यंत राजाने १०० हून अधिक ब्लॉग लिहिले आहेत. त्यातील कुठलाही डावा  उजवा तुम्ही करु  शकणार नाही.

विसरलो नाही, नाही विसरलो, अनेक वेळा घासलेली म्हण न लिहिता, राजा राजा होण्याचे श्रेय मी १००% सौ.भारतीस दिले पाहिजे.

माझ्या सर्व तुटपुंज्या वाचकास मी विनंती करतो. कृपया आपण सर्वानी राजाचा ब्लॉग www.bloggerspot// merajabolataahe फॉलो करून तो वाचावा त्यातील  प्रत्येक व्यक्ती चित्रा पासून बोध घेण्या सारखे बरेच काही आहे ह्या साठी तुमचा ब्लॉटींग पेपर उत्तम पाहिजे. राजाचे लिखाण  म्हणजे रिसर्च, व प्रत्यक्ष घेतलेला अनुभव, लिखाणाची शैली ज्याने वाचणाऱ्यास माहिती सहीत ती व्यक्ती आपणही ओळखतो असे वाटावे, ही खासियत होय.

तुमच्या वाचकां पैकी कुणास राजाशी हसतोदंलंन करण्याचा योग्य आला तर लक्षात ठेवा कि तुम्ही केवळ राजाला न भेटता ६०/७० व्यक्तींना भेटताय. 

 

ब्लॉग मधील मला आवडलेले काही लेख.   


 १. माझे वडील.   

. जे जे च्या मातीचा सुगंध 

३. नाथ पै...

४. गोळवलकर गुरुजी

५. अविनाश धर्माधिकारी 

७. तो एक काळ ...

८. मोहमद रफी  ( राजाचा अत्यन्त प्रिय गायक )

(राजाने खारला राहिला आल्यावर त्याच्या बंगल्याबाहेर एक फोटो काढून इन्स्टावर टाकलाय)

९.हिटलर 

१०. विवाह समारंभ 

केवळ एव्हडेच नाहीत कारण १००/ १५० लेखातून चांगले ब्लॉग शोधणे फारच कठीण टास्क. या सर्व व्यक्ती लेखा मध्ये टॉम अँड जेरी सारखा लेख मला सुखावून गेला .

ज्या ज्या वेळेस मी राजाला जे जे मध्ये भेटलोय, तेव्हां राजाच्या केबिन बाहेर असलेली नावाची पाटी वाचून माझी छाती विनाकारण फुगायची. पाटीवर लिहिले होते.

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष 

अधिष्ठाता



महत्वाचे :राजाच्या पेन इंक ड्राइंग चे 'माय रूटेड फ्रेंड्स' प्रदर्शन १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर  नेहरू सेंटर येथे आहे एक सुंदर अनुभव घेण्यासाठी 

जरूर भेट द्यावी, राजास प्रत्यक्ष भेटण्याची संधी जरूर घ्यावी.  


प्रिय वाचकहो तुम्ही जेव्हां कधी हा ब्लॉग वाचाल तेव्हां तुमच्या तुमच्या मित्र मंडळीना राजाच्या ब्लॉगची लिंक जरूर फॉवर्ड करा.





भेळ विचारांची

 


पुन्हा एकदा, जुन्या डायरीची  पाने चाळताना 

२० वर्ष पूर्वींचे तारीखवार भरकट, 

सवयीने केलेली नोंद,

२०/१/२०००

माणसे 

जेवढी वरती जातील तेव्हढीच  

जन्माला येणारी. नजर फिरवावी 

तेथे नजरेस पडणारी, 

घरात,दारात, रस्त्यात, विमानात

आगगाडीत, तुडुंब भरलेली, 

पूलांना वाकवणारी, 

सकाळ दुपार रात्र अथक फिरणारी.

माणसे कधीही जन्म घेतात 

गरीब श्रीमंत जात पात 

काही संबध नाही जेवढी अवतरतात 

तेव्हढीच लोप पावतात 

एक अद्भुत किमया, अद्भुत चक्र!

=============================

भांडण 

शब्द कसा आला?

एक भांडे दुसऱ्या भांड्यावर आपटले 

आदळले त्याचा जो कर्कश डणडण आवाज  

व दोन व्यक्ती मध्ये होणाऱ्या भांडणाच्या 

आवाजातील साम्य  ह्यामुळे 

भांडण शब्द तयार झाला  असावा.

=====================================

मन स्वछ असणे हे  काच स्वछ ठेवण्या सारखे.

मनाला स्थिर ठेवणे हे श्वास बंद करण्या येव्हढे कठीण.

======================================

पाण्यातील माश्याचे  अश्रू कोणी पाहाणारा 

 असा भूमंडळी कोण आहे?  कोणी असेल का? 

=============================








एक शांत तारा


 एक शांत तारा 

दूर आकाशात लुक लुकणारा 

स्वतःशी बोलणारा, हसणारा 

पाहाणाऱ्याला भारावून टाकणारा 

सर्वाहून वेगळा, आपलासा वाटणारा  

एक दिवस 

अचानक नाही दिसला 

आकाशात कोठे लुप्त झाला 

शोधून सापडेना, नजरेने सर्व ढग 

शोधले बाजू केले तरी पठ्ठ्या सापडेना 

कुठे केव्हान कधी निखळला 

कोणास ठाऊक? आता ह्या रिकाम्या 

जागेवर त्याच्या सारखे आगळे वेगळे 

कोण चमकणार ? 

ध्रुव ताऱ्याची जागा देखील अढळ

नाही राहिली का? 

मित्राला शोधायला.

हताश होऊन चंद्र देखील खंगत गेला,

फक्त काळोख उरला. 


आपले देखील असेच आहे.

काहीच शाश्वत नाही .

=======================

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ,वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.



चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...