Thursday, June 25, 2026

पुढच्या गुरुवारी

 हॅलो! कसा आहेस? बरा आहेस ना?



मग झालं. मी...  मी सध्या बाल्कनीत उभा आहे.


माउंट फुजी पाहतोय.

खरंच... घाबरू नकोस. माझी तब्येत अजून बरी आहे.

दार्जिलिंग, जपान किंवा हिमालयात जायचीही गरज पडलेली नाही.

तो इथूनच दिसतोय. माझ्या बाल्कनीतून.थोडी कल्पनाशक्ती आणि थोडं मावळतीचं ऊन मिळालं 

"इथून पाहिलंसकी समोरचा डोंगर अगदी माउंट फुजीसारखा दिसायला लागतो..."

 "बरं! सांग, तुझ्याकडे वेळ आहे का?"

"आहे. आकाशाएवढा." "म्हणजे?""सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत."

"राईट. ठीक आहे. मी येतो पुढच्या गुरुवारी. तयार रहा मात्र.

"वाट पाहता पाहता मला उशीर झाला तर?"

"जा निघून. तू वाट तरी किती पाहणार?" "तू काय, मी काय? वाट पाहता पाहता म्हातारे होणार..."

"झालोच आहोत."

"इतका थोडाच उशीर होणार?" "झाला तर जास्तीत जास्त अठरा मिनिटं." 

"अठराच का?" "सव्वीस का नाही?"

"माहीत नाही." "बहुतेक मेंदूने अठरा हा आकडा काढून माझ्या हातात ठेवला असावा."

"अलिकडे तो असले उद्योग करतो."

ट्रॅफिकवर आपलं थोडंच नियंत्रण असतं. आजकाल बघावं तिथे उशीरच करतायत. 

गाडी असो.ट्रेन असो.वा घोडा असो. अलिकडे सूर्योदयाची वेळ निघून गेली तरी सूर्याजी  महाराजांचा पत्ता नसतो. 

युद्धाच्या धुरामुळे वाट सापडत नसावी.

नाहीतर एवढा उशीर कशाला?

हल्ली  उबर करणाऱ्यालाही उबर मिळेपर्यंत उशीरच होत असतो.

अरे गाढवा, जागा हो!

मेंदू तुझा पूर्ण विस्कटलाय."पण काही झालं तरी पुढचा गुरुवार लक्षात ठेव.

दत्तजयंती देखील आहे."

"नक्की!"

"उशीर करू नकोस हं."

"प्रयत्न करीन."

"प्रयत्न नाही. ये."

"नक्की!"पुढच्या गुरुवारी, मी बाल्कनीत उभा आहे,माउंट फुजी पाहत.

वाट पाहत. किंवा कदाचित वाट न पाहताच.

No comments:

Post a Comment

पुढच्या गुरुवारी

 हॅलो! कसा आहेस? बरा आहेस ना? मग झालं. मी...  मी सध्या बाल्कनीत उभा आहे. माउंट फुजी पाहतोय. खरंच... घाबरू नकोस. माझी तब्येत अजून बरी आहे. दा...