Tuesday, June 30, 2026

रिकाम्या जागा भरा

 

रिकाम्या जागा भरा

सर्व काही मिळालं.

सर्व अनुभवायला मिळालं.

आयुष्य माझ्या डोळ्यांसमोरून निघून गेलं.

काय काय?

बालपण गेलं.

शाळा गेली.

कॉलेज गेलं.

जाहिराती गेल्या.

ऑफिसं गेलं.

मित्र गेले.

काही चेहरे गेले.

काही पत्ते हरवले.

काही रस्तेही हरवले.

मग वाटलं...

आता उरलं तरी काय?

पण आयुष्याला बहुतेक रिकाम्या जागा फार काळ आवडत नसाव्यात.

मग येतं...

आणखी काही.

एक नवीन मित्र.

एक नवीन ओळख.

एक नवं पुस्तक.

एक नवा विचार.

एक नवीन सकाळ.

किंवा एखादी हसरी खेळकर झुळूक.

 लक्षात आलं...

आयुष्य असंच असतं.

ते कधी पूर्ण रिकामं होत नाही.

ते सतत काहीतरी घेऊन जातं.

नकळत काहीतरी ठेवूनही जातं.

आपल्याला कळतं फक्त जाणं.

येणं मात्र नेहमी शांतपणे होत असतं.

म्हणून कदाचित...

सर्व काही जात नाही.

सर्व काही राहतही नाही.

मध्ये कुठेतरी..." बरेच काही..."

असं काहीतरी कायम उरतं.

"आपल्याला कळतं ते फक्त जाणं.
येणं मात्र नेहमी शांतपणे होत असतं."


अरुण काळे
जुलै २०२६

No comments:

Post a Comment

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...