Wednesday, September 26, 2018

गाढव











मध्यान्हाच्या सुमारास एका निर्जन वाटेवर
मला एक गाढव भेटले
त्याची टिंगल करण्याच्या उद्देशाने
मी गाढवास म्हणालो
सांग रे मला एकादी गोष्ट
गाढव म्हणाले, मी रे बाबा सांगू कसली गोष्ट?
मला अक्कल नाही म्हणून तर  मी ‘गाढव.’
गावातील “ढ”
तुला गोष्टच ऐकायचीच असेल तर
सांगता येते मला एकच गोष्ट
सांगू?
मोठ्या हुषारीने ‘हो सांग’ मी म्हणालो
मग ऐक तर... एक होता कापूस कोंड्या...
वाक्य कानावर पडताच ...
मी मागल्या पावलाने निघालो...
गाढव ओरडले “कुठे चाललास...
 कापूस कोंड्याचीगोष्ट सांगू...
गाढवाने माझा गाढव नव्हे
पोपट केला. 
कसा?
कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?
हा! हा! हा!
शिकलो तात्पर्य ह्यातून
समोरच्यास‘मूर्ख ‘समजून
उपहास करू नये.



Saturday, September 22, 2018

वावटळ २







अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    

“राजा की आयेगी बारात
रंगीली होगी रात
मगन मै नाचूंगी...”यह मगन है कौन?
उसे क्यू बताना है?
क्या वो डान्स मास्टर है?
क्या वो दोस्त है?
इन सभी सवालोका जवाब...
सांगेन कधीतरी...



दिसा माजि काहि तरी ते लिहावे
           (१८% महाराष्ट्र आजही अशिक्षित आहे त्यांचे काय?)
प्रसंगि अखंडीत वाचीत जावे
                          व्हा तयार व्हा तयार
सकल खेळ खेळू या
शक्तिवान युंक्तीवान
खेळुनिच होऊया
दुर्बलता तुछ् म्हणोनी 
टाकोनिच देऊया
                                      दिसते से नसते नसते  ते दिसते म्हणून असते से काही नसते म्हणून जग कशालाही 
फसते                    
मी रिकामा मन रिकामे,
वही रिकामी करायचे आता काय?
काम रिकामे, खिसा रिकामा,
गळणार कसा घाम,
घाम नाही म्हणून छदाम नाही
आता उरलय केवळ रिकामपण,
आहे की नाही रिकामी गम्मत!!

जिच्या हाती पाळण्याची दोरी           
ती म्हणे जग सांभाळी
पण...
जिच्या हाती लेंग्याची नाडी,
ती काय सांभाळी...
...संसार!!!
आहे की नाही एक छोटी

पण जीवनाची गम्मत !!
विचित्र पण सत्य स्वजन्माची नोंद
स्वहस्ते व्यवहारात अनेकवेळा करतो
स्वतःच्या मृत्यूची नोंद मात्र  आप्तेष्टासाठी
ठेऊन जातो आहे की नाही गम्मत! 

Thursday, September 20, 2018

भेळ





भेळ (भेल)
ज्याने ग्रहण केली
तो,ती,ते भेळीचे कायमचे दर्दी झाले
मग ती सुखी असो व ओली,
कोणाकडे ही विचारणा करून पहा,
आवडते का?‘हो’ चा गजर ऐकू येईल.
एक वेळ मिसळ नाकारणारेभेटतील,
पण भेळ नाकारणारा/री/रे  नाही हो भेटणार.
असाच एकदा  भेळीचा आस्वाद घेताना
डोक्यात किडा वळवळला...
भेळ आवडण्याचे कारण काय?
ह्याचे माझ्यापरीने विवरण करण्याचा
मी प्रयत्न केला तेव्हा लक्षात आले
की भेळीतील प्रत्येक जिन्नस
हा आपल्या आयुष्याशी निगडीत आहे
ज्याची चव बहुतानी चाखली आहे.
कसे ते बघा!


चूरमुरे: आयुष्यातील खुमासदार प्रसंग
मिक्स फरसाण: रोजचा दिन क्रम, ट्रेन, बस पकडणे,
तेच तेच चेहरे पाहणे, एकाच प्रकारचे ऑफिस कंटाळवाणे काम.
कांदा: वडीलधार्याचें डोळ्यात पाणी आणणारे बोलणे.
टमाटर: रसरशीत बातम्या.
बटाटा: चांगल्या गोष्टीस पुष्टी मिळणारे प्रसंग
कैरी: चवदार चट पटीत बातम्या. (गोस्सिप्स)
कोथमीर: ताजगी देणाऱ्या घडामोडी.
गोड चिंच चटणी: कानावर येणाऱ्या गोड बातम्या.
तिखट मिरची चटणी: स्वप्नातून जमिनीवर आणणारे प्रसंग
पुरी: ताजे पण घोळलेले प्रसंग.

हे सर्व मिश्रण म्हणजेच आयुष्य.
ह्यातला एखादा जिन्नस कमी जास्त
झाला की जशी भेळीची चव बदलते,
त्याप्रमाणे आयुष्य देखील वेगळे वळण घेते.

पुन्हा जेव्हां भेळ खाल तेव्हां
आयुष्ष्याशी मेळ जमवाल.




Tuesday, September 18, 2018

अशी पाखरे येती...


रोजच्या शिरस्त्या प्रमाणे
फेरफटका मारून समुद्रा जवळील 
रोजच्या बाकड्यावर बसून लाटांचा
शिवाशिवी चा खेळ पाहत होतो
त्या बरोबर मनात देखील
आठवणीच्या लाटाआपटत होत्या.
बघता बघता सूर्यनारायणाकडे लक्ष गेले,
राव डुबकी घेण्याच्या तयारीत होते
सूर्याजीने बुडी मारली देखील,
एवढ्यात एक मोठी लाट
मनात उसळली...
आयुष्याच्या टप्या टप्या वर
भेटलेल्या व्यक्ती हृदयास स्पर्श करून
सुर्यनारायाणा सारख्या बुडी मारून
विस्मरणाच्या समुद्रात 
केव्हा नाहीशा होतात ते कळत देखील नाही 
एकांतात यातील एखाद्याची लाट
आठवणीच्या किनार्यावर आपटते.
त्या व्यक्ती बरोबर घालवलेला वेळ,
गमती जमती ह्या एका 
वाळूच्या किल्ल्यासारख्या आकार घेतात
एवढ्यात दुसरी लाट परतताना
किल्ल्यास उध्वस्तकरून किनार्या पासून दूर नेते. 
आणि  नकळत गाण्याच्य दोन ओळी
ओठातून अस्पष्ट उमटतात...

अशी पाखरे येती आणिक
स्मृती ठेवुनी जाती...
दादा...

वाढ दिवसाच्या शुभेच्छा! 


Sunday, September 16, 2018

आभास











एके दिवशी काय झाले
विचारांच्या घोड्यावर बसून
मी झालो  राजा ना हुजरे ना प्रजा
एकटाच फिरत होतो महालात
राजाच्या रुबाबात
मारली हाक टाळी वाजवीत
“कोण आहे रें तिकडे?"
आदळली  हाक माझीच
माझ्या कानावर
विसरलो होतो, न हुजरे न तैनात
दिले उत्तर स्वतःच हुकुम महाराज”
 हळू आवाजात,ओशाळत
दिवा स्वप्नाचा फुगा फोडत... येत भानावर 
स्वगत करीत 'महाराज उतरा जमिनीवर
आणि चला कामावर'.  


Wednesday, September 12, 2018

बाप्पा मोरया रे!







तू आहेस यावर माझा विश्वास आहे,

आता तू कुठे आहेस हे सांगणे कठीण.
जळी स्थळी पाषाणी नक्की आहेसच!
त्या शिवाय हा निसर्ग 
आम्ही कसा पाहिला, अनुभवला असता? 
ह्या निसर्गाची प्रेमळ व रुद्र रुपाची प्रचीती
म्हणजेच तू आहेस!
ह्या अनेक रूपात तुझे दर्शन घेताना
प्रेम, थोडी भीती, आदर,
अशा भावनांचे समिश्रण वादळ थैमान घालते.
तुला कोठे पाहावे, शोधावे. 
ह्याचा उलगडा मी माझ्या परीने सोडविलाय!
सामोरे येणारे काहीही 
मनुष्य प्राणी,जीव जीवाणू, 
अचल वस्तू, निसर्ग! 
ह्या सर्वात तू आहेस,
हे मान्य करून मी जेव्हा एकटा असतो, 
तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास म्हणजेच तू! 
हे मी चांगले हेरले आहे.
त्या बळावर आज तू मला भरपूर काही दिले आहेस. 
त्या बरोबर महत्वाची मनशांती पण  दिली आहेस.
असो आज तुझ्या एका रूपाचा
आम्ही मानव उदो उदो करतो
तेव्हां...
गणपती बाप्पा मोरया!!

रिमोट













आयुष्याचा रिमोट
तो वरचा, न देताच जन्मास घालतो
तोच सुरवात करतो
जीवनाचे टी वी चे च्यानल.
बदलत राहतो,
आपले बालपण डिस्ने ने
सुरुवात करतो व ६० ओलांडली
की ब्रह्मकुमारी पर्यन्त्
बदलत राहतो.
मधल्या तारुण्याच्या टप्यात
शिक्षण,खेळ, नाच, गाणे,
बातम्या,सिनेमा, फॅशन,
जगभरातील पाक कृती.
कधी,कधी...जग प्रवास घडवतो,
४०शी ओलांडली आयुष्य निरोगी कसे ठेवावे,
याची आठवण करून देतो.
योग आणि स्वास्थ्याचे धडे 
आपल्या कडून गिरवून घेतो,
जीवनाचे महत्व न समजल्यास,
एकाद दोन झटके देवून 
सावध करतो.
तेव्हां शहाण्याने समजून घ्यावे की
सावधान! आपली बॅटरी 
त्याने बदलली आहे.
आता नवे अवसान आणून,
त्याच्या आज्ञेनुसार भक्ती,व आरोग्य,
च्यानलची परिक्रमा चालू ठेवावी. 
शेवटी त्याला च्यानल बदलायचा कंटाळा आला
की झाला तुमचा टी वी ...?

Tuesday, September 11, 2018

आत्मविश्वास









दरड कोसळलीय

वाहतूक खोळम्बलीय
‘कशाला निघतोस आज?
आठवड्याने जा
सर्व काही सुरळीत
पूर्ववत होईल मग जा’
असे दिवसांचे भाकीत
करणार्यांचे कौतुक वाटते
ह्यांना भविष्याची केवढी खात्री
व केवढा विश्वास
आठवड्याने दरड कशावरून
नाही कोसळणार ?
पुढचा आठवडा  
आपण बघणारच ह्याचा
केवढा आत्मविश्वास,
पण काही म्हणा
हा दांडगा आत्मविश्वासच
तुमचे आमचे आयुष्य वाढवितो.
उद्याची सकाळ पाहणारच
ह्या खात्रीने भविष्यातील
स्वप्ने रंगवितो आणि येणाऱ्या दिवसाचे
गणित बिनधास्तपणे मांडतो.





चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...