उजाडला...उजाडला...उजाडला...
केलेस तरी काय?
इथे बसलो तिथे बसलो
तिथून उठलो इथे बसलो
उठलास बसलास पण केलेस तरी काय?
कायनाय कायनाय
नाय नाय म्हणायला
लाज नाही वाटत काय?
कसली लाज कसले काय?
वाचायला गेलो तर डोळे थकतात,
लिहायला गेलो तर शब्द अडखळतात.
होते वेळ न-स-त्या उपद्वयापाची
फेसबुकच्या फेर फटक्याची,
यू ट्यूब वर मन रमवण्याची,
पोट गुरगुरून आठवण
करून देते भूकेची,
एकचा ठोका काही थांबत नाही...
...जेवल्याशिवाय राहवत नाही
भरले पोट दिला ढेकर,
आता हो काय करायचे?
घेतला पेपर पुन्हा वाचायला,
मथळ्याच्या पुढे बाकी बातम्या पुसटधुरकट
पापण्या झाल्या जड, झाली वेळ वामकुक्षीची!!
आली जाग चहाच्या तल्लफेनी
गरम गरम बातम्या, गरम गरम चहाचे घोट,
वाजले चार, वाजले पाच, झाले
साडेपाच
झाली वेळ फेर् फटक्याची,
झाले फिरून सुर्य नारायणाला बुडवून.
दिला कान ताज्या बातम्यांना
लावले डोळे,एका मागे एक सुरु
असलेल्या tvमालिकांना,
बोध काही नाही निव्वळ करमणूक.
बसलो वाट पाहत बायकोच्या डुलकीची
जसा लागतो डोळा तिचा,
मग काय माकडाच्या हाती ...
तसा माझ्या हाती येतो रीमोट...
सुरु झाला, मनचाहा च्यानल संचार,,,
खेल कुद्से लेकर पुराने तरानेतक
बस आनंद ही आनंद,
चक्क१२ च्या ठोक्यापर्यंत.
मग दिली करून जांभईनेआठवण
मावळला.,,मावळला...
आणखी एक दिवस!
आहे की नाही रोजची गम्मत